खानापूरच्या विकासासंदर्भात आवाज उठविण्यासाठी राज्य सरकारविरोधार्थ सुवर्णविधानसौधच्या दिशेने चलो सुवर्णविधानसौध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, शी माहिती खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी दिली आहे.

या पदयात्रेत शेतकरी, ग्रामस्थ सहभागी होणार असून १२ डिसेंबर रोजी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात खानापूरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हि माहिती दिली. बेळगाव सुवर्णविधानसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान समग्र खानापूर तालुक्याच्या विकासाच्या आग्रहास्तव हा पदयात्रेच्या निर्धार करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
सदर पदयात्रा १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता खानापूरपासून सुरु होणार असून खानापूरहून बेळगावच्या सुवर्णविधानसौध पर्यंत सुमारे ४० किलोमीटर पर्यंतचा प्रवास पायी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता हि पदयात्रा सुवर्ण विधानसुधासमोर पोहोचणार आहे. बोम्मई सरकारला कान आणि डोळे नाहीत. यामळे खानापूर तालुक्यातील जनता हि पदयात्रा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केली आहे असे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील शेवटचा तालुका हा खानापूर असल्याने या भागाकडे कोण्ही ढुंकूनही पाहत नसल्याची तक्रार निंबाळकर यांनी केली. अनंतकुमार हेगडे हे डोळे मिटून जिंकून आले असून त्यांनी आतापर्यंत या भागाला भेटही दिली नसून या सर्वांच्या विरोधात चलो सुवर्ण विधानसौध अंतर्गत पदयात्रेचे आयोजन केले आहे, असे त्या म्हणाल्या. सुवर्णविधानसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणत्याही आंदोलनांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे पोलीस विभागाने जाहीर केले आहे. हे अधिवेशन शांततेत पार पडण्याचा निर्धार सत्ताधारी सरकारने केला आहे. परंतु अधिवेशनाचे बिगुल वाजल्यापासून अनेक आंदोलकांनी आंदोलनाचा निर्धार केला आहे. आता खानापूर तालुक्याच्या विकासासाठी पुकारण्यात आलेले हे आंदोलन सुवर्णनिधानसौधवर कसे धडकेत? आणि सरकार या आंदोलनाला आणि आंदोलकांना कसा प्रतिसाद देईल, हे अधिवेशनादरम्यान स्पष्ट होईल.


Recent Comments