Belagavi

बाबरी मशीद पाडाव दिनानिमित्त काही ठिकाणी बंद

Share

उत्तर प्रदेशातील वादग्रस्त बाबरी मशिदीच्या पाडाव दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात काही ठिकाणी आज बंद पाळण्यात आला. मुस्लिम व्यावसायिकांनी दुकाने, व्यवहार बंद ठेवून वादग्रस्त मशीद पाडल्याचा निषेध केला.

बाबरी मशिदीच्या पाडाव दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील दरबार गल्ली, भेंडीबाजार, फोर्ट रोड, खडेबाजारचा काही भाग आदी ठिकाणी मुस्लिम व्यावसायिकांनी दुकाने, व्यवहार बंद ठेवून वादग्रस्त मशीद पाडल्याचा निषेध केला. यासंदर्भात बोलताना अरिफ कटगेरी यांनी, बाबरी मशीद पाडून आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. आता मथुरेचा मुद्दा उकरून काढत आहेत.

आमच्यावर अन्याय होऊ नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी असे आवाहन केले. दरम्यान, बाबरी मशीद पाडाव दिनानिमित्त शहरात अनेक ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. एकीकडे हिंदू संघटनांनी विजयोत्सव साजरा केला तर दुसरीकडे मुस्लिम व्यावसायिकांनी बंद पाळून निषेध व्यक्त केल्याचे यानिमित्त दिसून आले.

 

Tags: