Belagavi

देश असेपर्यंत आंबेडकरांचे विस्मरण होणे शक्य नाही : आ. एन. ए. हॅरिस 

Share

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी देशभरात ठिकठिकाणी या महामानवाला अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे बेळगावतही बाबासाहेबाना नमन करण्यात आले.

बेळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेसचे विधान परिषद निवडणूक पक्ष निरीक्षक आ. एन. ए. हॅरिस यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नमन केले. त्यानंतर बोलताना आ. हॅरिस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे हा देश असेपर्यंत त्यांचे विस्मरण होणे शक्य नाही.

घटनेच्या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेला न्याय, हक्क, समानतेचे तत्व प्रदान केले. ते स्वीकारून म्ही वाटचाल केली पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच देशातील गरीब, दलित, पददलितांच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच काँग्रेस वाटचाल करत आहे. देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी काँग्रेस वचनबद्ध आहे असे आ. हॅरिस यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस नेते मल्लेश चौगुले, जयश्री माळगी, मंजू कांबळे, तौसिफ़ मुल्ला आदी उपस्थित होते.

 

Tags: