विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून निवडणूक वाढविणारे लखन जारकीहोळी यांनी आज बेळगाव ग्रामीण भागात प्रचार सभा घेऊन मतयाचना केली.

रविवारी बेळगाव ग्रामीण भागात प्रचार सभा घेऊन विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून निवडणूक वाढविणारे लखन जारकीहोळी यांनी मतदारांशी संवाद साधला. प्रचारसभेत मतदारांना उद्देशून बोलताना लखन जारकीहोळी म्हणाले, या विधान परिषद निवडणुकीत मला आपल्या प्रथम पसंतीचे मत देऊन निवडून दिल्यास सर्व पंचायतीचा विकास करण्याचे आश्वासन मी देतो. ६ वर्षांच्या कार्यकाळात सर्वप्रथम विकासाचे पर्व हाती घेऊन सतत आपल्या संपर्कात राहीन. आपल्या कामकाजाला पाठिंबा देईन, असे आश्वासन लखन जारकीहोळी यांनी दिले. 
गोकाकमधील जनतेप्रमाणेच बेळगावच्या जनतेसाठीही सेवा करण्याची संधी मला देऊन कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आपले बहुमोल मत देऊन मला विजयी करा, असे आवाहन लखन जारकीहोळी यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भातकांडे यांनी लखन जारकीहोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी विविध ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments