Belagavi

डॉ. शिवबसव स्वामीजींच्या १३२ व्या जयंतीनिमित्त षडस्थल ध्वजारोहण

Share

कायकयोगी महाप्रसादी शतायुषी परमपूज्य डॉ. शिवबसव स्वामीजींच्या १३२ व्या जयंतीनिमित्त बेळगावात रविवारी षडस्थल ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

बेळगावातील नागनूर रुद्राक्षी मठाचे कायकयोगी महाप्रसादी शतायुषी परमपूज्य डॉ. शिवबसव स्वामीजींच्या १३२ व्या जयंतीनिमित्त बेळगावात आज षडस्थल ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. डंबळ, गदग येथील यडेयुरु जगद्गुरू तोंटदार्य संस्थानमठचे डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला.

नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात अक्कन बळगच्या महिलांनी ध्वजवंदन गीत सादर केले. त्यानंतर डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांनी गुरुकृपेचे महत्व उपस्थितांना सांगितले. यावेळी अक्कन बळग, नागनूर प्रभुदेव प्रतिष्ठानच्या सदस्य आदी उपस्थित होते.

 

Tags: