विजापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसामुळे रस्त्यांना नदी–नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यातच एक मोटरसायकल वाहून गेल्याची घटना घडली.

विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील होनवाड गावात मुसळधार अवकाळी पावसाने रस्त्यांवर नदी-नाल्यांप्रमाणे पाणी वाहून जात आहे. पावसाच्या थैमानामुळे लोक हैराण झाले आहेत. पावसाचे पाणी शेत-शिवारात आणि रस्त्यांवरही साचून वाहात आहे. होनवाड गावात अशाच एका पाण्याच्या प्रवाहात एक मोटरसायकल वाहून गेली.


Recent Comments