Belagavi

कामाची दखल घेऊन विधान परिषदेवर निवडून द्या : कवटगीमठ

Share

विधान परिषद सदस्य या नात्याने दोनवेळा निवडून येऊन जनतेची अपार सेवा केली आहे. आता तिसऱ्या वेळीही सेवेची संधी मतदारांनी द्यावी असे आवाहन भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी केले.

बेळगावात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महांतेश कवटगीमठ म्हणाले, आपण केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाने तिसऱ्यांदा विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. गेल्या दोन्ही मुदतीत मतदारसंघातील ग्राम पंचायतींना अधिकाधिक अनुदान मिळवून देऊन त्यांना सक्षम केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना ग्रापं पातळीवर राबवून त्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे.

स्थानिक स्वराज संस्थांच्या समस्यांवर अधिवेशनात आवाज उठवून त्या सोडविल्या आहेत. केएलई संस्थेच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सेवा बजावीत आहे. साखर उद्योगात अनेक सकारात्मक बदल केले आहेत. या कामाची दखल घेऊन मतदारांनी मला पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, सर्व तालुक्यांच्या, गावांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक गावच्या स्मशानभूमीच्या समस्या सभागृहात मांडून त्या सोडविल्या आहेत. केरळच्या धर्तीवर ग्रापं सदस्यांचे मानधन वाढविण्यासाठी सरकार पावले उचलत आहे असे कवटगीमठ यांनी सांगितले. बाईट

 

Tags: