बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नगरसेवकांनी रविवारी बेळगावात आपल्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली.

दर रविवारप्रमाणे, आजही भाजप नगरसेवक नितीन जाधव, अभिजित जवळकर यांनी प्रभाग क्र. २९मधील गोगटे कॉलेज परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी त्यांनी प्रभागातील रहिवासी आणि दुकानदारांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, दर रविवारी बेळगाव दक्षिणचे आ.
अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकेका ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य रक्षणासाठी सर्वानीच आपापला घर-परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या स्वच्छता मोहिमेत अनेक भाजप कार्यकर्ते, स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.


Recent Comments