बेळगाव स्थानिक स्वराज मतदारसंघात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात रविवारी निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

होय, बेळगावचे तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील ज्योती कॉलेजमध्ये पोलिंग बूथ निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मास्टर ट्रेनर नागराज मरेन्नावर यांनी उपस्थितांना निवडणूक प्रशिक्षण दिले.
यावेळी मास्टर ट्रेनर नागराज मरेन्नावर यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना, मतपेट्यांचे वर्गीकरण, मतदान प्रक्रिया, मतदार याद्यांची पडताळणी, मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक आदी बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याने अत्यंत जबाबदारीने निवडणुकीचे कर्तव्य पार पाडावे अशी सूचना त्यांनी दिली.
येत्या १० डिसेंबरला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठीची सर्व पूर्वतयारी बेळगाव जिल्हा प्रशासन करत आहे.


Recent Comments