बेळगावातील आदर्शनगरात रविवारी स्थानिक नगरसेवक नितीन जाधव, मंगेश पवार यांनी सहकाऱ्यांसह स्वच्छता मोहीम राबवली.

बेळगावातील वडगावमधील आदर्शनगर चौथा क्रॉसवरील गणेश गार्डनच्या परिसरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून सांसर्गिक रोगांचा धोका वाढल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक मंगेश पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. 
या स्वच्छता मोहिमेत नगरसेवक नितीन जाधव, गणेश देसाई, कल्लाप्पा शहापूरकर, रुपेश बापसेठ, महेश सुतार, अरुण गावडे, शंकर सोनटक्की, प्रशांत कंग्राळकर आदींनी भाग घेतला.


Recent Comments