Belagavi

अनैतिक संबंधातून युवकाचा निर्घृण खून

Share

अनैतिक संबंधांच्या संशयावरून युवकाचा डोक्यात रॉडने प्रहार करून खून करून मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला. ही घटना रायबाग तालुक्यातील भेंडवाड गावात उघडकीस आली.

होय, ३० वर्षीय युवक अर्जुन मारुती नगाडे याचा रॉडने डोक्यात प्रहार करून निर्घृण खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याची घटना भेंडवाड गावात घडली आहे. अर्जुन गेल्या ४-५ दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या कुटुंबीयांनी रायबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र आज सकाळी अर्जुनाचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत गोकाक तालुक्यातील एका कालव्यात आढळून आला आहे. त्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस सूत्रानुसार अर्जुन नगाडे याचे त्याच गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या रागातून भीमाप्पा तट्टेमनी वय ३४, याने अर्जुनाचा खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली आहे. या प्रकरणी रायबाग पोलिसांनी भीमाप्पा याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे. रायबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Tags: