शटर तोडून बार आणि वाईन शॉप लुटल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी येथे घडली.

होय, शुक्रवारी मध्यरात्री १च्या सुमारास अज्ञात लुटारूंनी बसवण बागेवाडी येथील बालाजी बार आणि गायत्री वाईन शॉपचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
त्यानंतर दारूच्या काही बाटल्या आणि गल्ल्यातील ४ हजार रुपये रोख रक्कम लांबवली. चोरट्यांचे चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. तोंडाला मास्क घालून आलेल्या चार चोरटयांनी चोरी केल्याचे दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. बसवण बागेवाडी पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा केला.


Recent Comments