Belagavi

घाबरू नका; तुम्हाला फसवणार नाही ! भालचंद्र यांचे कवटगीमठ याना अभय

Share

गुरु, घाबरू नका. तुम्हाला फसवणार नाही असे सांगत अरभावीचे . केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना अभय दिले.

होय, अरभावीत कवटगीमठ यांच्या प्रचारसभेत बोलताना भालचंद्र यांनी हे अभय दिले. ते म्हणाले, रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मला मंत्रिपद मिळावे यासाठी १५ आमदारांनी मोहीम चालवली. त्यात दुर्योधन ऐहोळे, महादेवप्पा यादवाड आणि कवटगीमठ सुद्धा होते. त्यामुळे गुरु तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला फसवणार नाही असे भालचंद्र यांनी सांगितले. काँग्रेसचा पराभव व्हावा आणि भाजप जिंकावा हेच आमचे उद्दिष्ट आहे. गेल्यावेळीही ते जिंकतील असे मी सांगितले होते आणि झालेही तसेच.

कवटगीमठ याना देवाचा आशीर्वाद आहे. अरभावी मतदार संघात विधान परिषदेचे ६०८ मतदार आहेत. त्यातील केवळ चौघे आमच्या विरोधात आहेत. पण ६०४ आमच्यासोबत आहेत. त्यामुळे तुम्ही मुळीच घाबरू नका असे भालचंद्र यांनी कवटगीमठ याना उद्देशून सांगितले.

एकंदर बंधू लखन आणि कवटगीमठ याना विधान परिषदेत पाठवण्यासाठी रमेश आणि भालचंद्र या जारकीहोळी बंधूंनी चांगलीच कंबर कसली आहे. मतदार त्यांना कितपत साथ देतात हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

 

 

 

Tags: