९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी भुजबळ नाॅलेज सिटीत सजलेल्या कुसुमाग्रजनगरीत दिमाखात उद्घाटन होत आहे. सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

संमेलनस्थळी लसीकरणाची व्यवस्था
साहित्य संमेलनात लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले. तर मनपा आयुक्तांनी लस घेतली नसली तरीही थर्मलस्क्रीनिंग करून लक्षणे नसल्यास प्रवेश देण्याचे जाहीर करत त्याच ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. या निर्णयानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनीही आपल्या आदेशात सुधारणा करत साहित्य संमेलनात प्रवेश देताना लस बंधनकारक असली तरीही ज्यांनी लस घेतली नसेल अशांसाठी संमेलन प्रवेशद्वारावरच लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार असून तेथेच डोस दिला जाईल. अन् संमेलनस्थळी मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.


Recent Comments