बेळगावच्या वंटमुरी कॉलनी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ३३ ही खूप जुनी शाळा आहे. या शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जय कर्नाटक जनपर वेदिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

शुक्रवारी बेळगाव जिल्हा पंचायतीच्या कार्यालयात जिल्हा पंचायत सीईओंकडे जय कर्नाटक वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या सदस्यांनी शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी मागणी केली. ३२५ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासाठी तातडीने शाळा इमारत बांधकामाचे काम हाती घ्यावे, असा आग्रह करत जिल्हा पंचायत सीईओंना निवेदन देण्यात आले. 
यासंदर्भात अधिक माहिती देताना एसडीएमसी अध्यक्ष दत्ता बिलावर यांनी सांगितले कि, डीडीपीआय, बीईओ यांची भेट घेतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेण्यात आली असून शाळेच्या इमारतीला टाळे ठोकून विद्यार्थ्यांची सोया इतरत्र करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार नव्या इमारतीच्या बांधकामाची मागणी घेऊन आज जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपण आलो असल्याचे, ते म्हणाले.
यावेळी इरफान अत्तार, सुधीर संभाजी, राजू भरत, रवी राजशेखर आदी उपस्थित होते.


Recent Comments