Belagavi

लहान मुलांमध्ये ओ-मायक्रॉन चा संसर्ग होईल का? ओ-मायक्रॉन बचावासाठी काय करावे? डॉ. माधव प्रभू यांनी दिली माहिती…

Share

कोरोनाच्या ओ – मायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आफ्रिकेमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. भारतात देखील ओ-मायक्रॉन संदर्भात अनेक तर्क-वितर्क लढविले जात असतानाच काल कर्नाटकातील बंगळूरमध्ये ओ-मायक्रॉन पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळले असून याचा लहान मुलांवर कोणता परिणाम होईल का? त्यांचे संरक्षण कसे करावे, यासंदर्भात विस्तृत माहिती दिली आहे बेळगावमधील डॉ. माधव प्रभू यांनी… काय आहे ओ-मायक्रॉन संबंधित माहिती जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून….

कर्नाटकातील बंगळूरमध्ये आफ्रिकेवरून परतलेल्या दोंघांमध्ये ओ-मायक्रॉन पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली असून याने जनतेमध्ये पुन्हा भीती बळावली आहे. यासंदर्भात बेळगावचे डॉक्टर माधव प्रभू यांनी विस्तृत माहिती दिली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा फैलाव सुरु झाला असून ओ-मायक्रॉन या नव्या विषाणूसंदर्भात जागरूक राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदर विषाणू हा वेगाने फैलावत असून कोविड, डेल्टा यापेक्षाही गंभीर असा ओ-मायक्रॉन नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हात-पायांचे दुखणे इतकीच लक्षणे प्रामुख्याने या विषाणूची जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविडपेक्षा भयानक असे कोणतेही परिणाम दिसून येत नसून ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांना ओ-मायक्रॉन ची बाधा होणार नाही, असे नसल्याचे ते म्हणाले. ओ-मायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायरझरचा नियमित वापर आणि सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्याचे डॉ. माधव प्रभू यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये लहान मुलांमध्येही हा संसर्ग जाणवला असून याचे अधिक परिणाम झाले नसल्याची माहिती आहे. ताप आणि हात-पाय दुखी मात्र तीन दिवस असू शकते. घाबरण्याची कोणतीही गरज नसून लवकरच लहान मुलांवरील लस देखील उपलब्ध होईल, आपल्यासहीत लहान मुलांचेही लसीकरण करण्याची गरज आहे, असे माधव प्रभू यांनी सांगितले.

कोरोनाच्या ओ मायक्रॉन या विषाणूचा फैलाव वेगाने होत चालला आहे. याचे परिणाम अद्यापही स्पष्ट नसून केवळ ताप, आणि हात पाय दुखी इतकेच जाणवल्याने तज्ञाचे मत आहे. कोविड प्रमाणे गंभीर परिणाम या विषाणूचे कोविडसह ओ-मायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी सर्व मार्गदर्शक नियमावलीचा प्रत्येकाने अवलंब केलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया डॉ. माधव प्रभू यांनी दिली आहे.

Tags: