Belagavi

काजिर्णे धनगरवाडातील २५ विध्यार्थ्यांना सायकल वाटप

Share

बेळगाव शेजारील चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील काजिर्णे धनगरवाडा येथील २५ विध्यार्थीविद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करून दानशुरांनी त्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे.

चंदगडमधील सरकारी न्यू इंग्लिश स्कूल धनगरवाड्यापासून ८ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या विध्यार्थ्यांना शाळेला जाताना रोज अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे काही एनजीओंच्या प्रमुखांनी आणि समाजसेवकांनी त्यांना २५ सायकली भेट देऊन त्यांची शाळेला जाण्या-येण्याची अडचण दूर केली.

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी, ग्रामीण मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी ग्रामीण भागात ‘ऑपरेशन मदत’ अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. खानापूर आणि चंदगड तालुक्यातील गवळीवाडा, धनगरवाडा यासारख्या वस्त्यांमध्ये शालेय विध्यार्थ्यांना वरचेवर मार्गदर्शन, मदत देण्यात येते असे सायकली वाटप केलेल्या दानशूर मान्यवरांनी सांगितले.

या सायकल वितरण कार्यक्रमाला व्हिक्टर फ्रान्सिस, बबन कुगजी, अक्षय हुनशीकट्टी, प्रसाद पाटील, चंद्रकांत धामणेकर, डॉ. सुरेख पोटे, डॉ. राजश्री अनगोळ, डॉ. अनिल पोटे, गीतांजली रेडकर, विजय बद्र, संतोष अनगोळकर, डॉ. केतक पावसकर, प्रशांत बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Tags: