Bailahongala

हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलन करण्यासाठी बळीराजा सज्ज

Share

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह करत, राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेळगावमधील सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती नेगीलयोगी शेतकरी सेवा संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे.

बैलहोंगल तालुक्यातील मरडीनागलापूर गावात यासंदर्भात शेतकरी नेत्यांनी पूर्वतयारी बैठक आयोजिली होती. या बैठकीत आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला.

यावेळी रवी पाटील बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांना अश्रूंच्या पाण्याने हात धुण्याची वेळ आली असून सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेधण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांच्या एकजुटीने आंदोलन करण्यात येणार आहे.

या बैठकीला नेगीलयोगी शेतकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज मोकाशी, महिला घटकचे उपाध्यक्ष निलाप्पा शिंत्री, पदाधिकारी बसम्मा काद्रोळी, मल्लय्या पुजार, उमेश काद्रोळी, वीरभद्रप्पा नायकर, कल्लाप्पा अप्पन्नावर, यल्लाप्पा करवीनकोप्प, नागेश शिंदे, बसवराज भंगी आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Tags: