Belagavi

रमेश याना दोन्ही उमेदवार विजयी करणे अशक्य : सतीश जारकीहोळी

Share

 रमेश जारकीहोळी यांना दोन्ही उमेदवार निवडून आणू शकत नाहीत. दोघांपैकी केवळ एकालाच ते निवडून आणू शकतील असे भाकीत केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले

शुक्रवारी बेळगावातील काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना आ. जारकीहोळी म्हणाले, गोकाक, आरभावीत उमेदवार नेऊन प्रचार करण्याची गरज नाही. रमेश जारकीहोळी यांनी काहीही केले तरीही ते केवळ एकच उमेदवार निवडून आणू शकतील. दोन्ही उमेदवारांना ते निवडून आणू शकणार नाहीत असे सांगितले.

रमेश जारकीहोळी यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. त्यांच्या पक्षातच आधी गोंधळ आहे. तो त्यांनी दूर करावा. रमेश जारकीहोळी यांचे हे असले काही पहिले विधान नाही. त्यांच्या विधानावर कोणाला प्रत्युत्तर देता येणार नाही असा उपहास केला. लखनवर मी टीका केली आहेच. त्यांचा आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. आम्ही निवडणूक लढवतोय ती भाजप आणि लखनविरोधात. यात कुटुंबाला आणण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्यावेळी आम्ही जरा दुर्लक्ष केले. पण आता विधान परिषद निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. काँग्रेसची मते सुरक्षित राखली आहेत असे सतीश म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के, शिवकुमार यांनी रमेश याना मोठा सावकार संबोदल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी राजकीय हेतूने टीका केली असावी. त्यासाठी मी कशाला डोकेदुखी करून घेऊ असे त्यांनी सांगितले.

एकंदर, भाजप आणि अपक्ष हे दोन्ही उमेदवार विधान परिषद निवडणूक जिंकू शकणार नाहीत. दोघांपैकी एकालाच हा फड जिंकता येईल असे भाकीत सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. ते कितपत खरे ठरते हे १४ डिसेंबरलाच कळणार आहे.

 

 

Tags: