नेहमी गुंडगिरी आणि हत्यांनी गाजणारा भीमातीर पुन्हा एकदा भीषण हत्येने थरारला आहे. विजापूर जिल्ह्यातील आलमेल शहरात नगरपंचायतीच्या माजी सदस्याचा भीषण खून करण्यात आला आहे.

होय, आलमेल शहरात नगरपंचायतीचा माजी सदस्य प्रदीप एंटमान याचा दगड, लाठ्या-काठ्यांनी ठेचून खून करण्यात आला आहे. रौडीशिटर असलेला प्रदीप एंटमान एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मित्रांसमवेत जात असताना ४-५ हल्लेखोरांनी त्याला अडवून त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी दगडांनी ठेचून आणि लाठ्या-काठ्यांनी बडवून जबर जखमी केले. त्यात तो जागीच ठार झाला. आलमेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील सोपस्कार पार पाडले.


Recent Comments