दिगंबर जैन समाजाचे परमपूज्य आचार्य १०८ श्री धर्मसेन मुनी महाराज आणि परमपूज्य आचार्य १०८ श्री वृषभ सागर मुनी महाराज यांचे गुरुवारी सायंकाळी पिरनवाडी येथे आगमन झाले. त्यानिमित्त त्यांचे जैन समाजाच्या वतीने पूर्णकुंबी मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले.

जैन समाजाच्या वतीने पिरनवाडीत येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पंचकल्याण महोत्सवात भाग घेण्यासाठी परमपूज्य आचार्य १०८ श्री धर्मसेन मुनी महाराज आणि परमपूज्य आचार्य १०८ श्री वृषभ सागर मुनी महाराज यांचे गुरुवारी सायंकाळी पिरनवाडी येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जैन समाजाचा जनसागर लोटला होता. पूर्णकुंबी मिरवणूक काढून दोन्ही मुनी महाराजांचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. यावेळी जैन समाजाचे श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फेब्रुवारी २०२२मध्ये पिरानवादी येथे जैन समाजातर्फे पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सर्व तयारी आतापासूनच करण्यात येत आहे असे भगवान श्री १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीने कळविले आहे.


Recent Comments