विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून अनेक व्यासपीठांवर प्रचारार्थ आलेल्या राजकारण्यांनी विरोधी पक्षावर टीकेची बरसात केली आहे. बेळगावमधील पंत बाळेकुंद्री येथे आलेले माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेस राज्याध्यक्ष डी . के शिवकुमार यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांना गुंडांची प्रतिमाही दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीचे अंतिम काही दिवस वाढत्या राजकीय चर्चांचे लक्ष्य ठरले आहेत. या विधान परिषद निवडणुकी राष्ट्रीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून प्रचारासाठी आलेल्या नेतेमंडळींकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. बेळगावमधील पंत बाळेकुंद्री येथे आलेल्या रमेश जारकीहोळींनी आज जोरदार बॅटिंग केली आहे. मागील वेळी विवेकराव पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. ६ वर्षे काँग्रेस साठी कामही केले. मागासवर्गीय जनतेची काँग्रेसने फणसणूक केली असून विवेकराव पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली असती तर लखन जारकीहोळी निवडणूक लढविले नसते, असे स्पष्टीकरण रमेश जारकीहोळी यांनी दिले.
रमेश जारकीहोळी पुढे म्हणाले, लखन जारकीहोळी काँग्रेसला हरवण्यासाठी निवडणुकीत उभे आहेत. यासंदर्भात गेल्या तीन महिन्यांपूर्वी वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली असून बेंगळूरमधील गुंड बेळगावमध्ये येऊन राजकारणात हस्तक्षेप करत आहेत, अशा वृत्तींना ठेवण्यासाठी अशा पद्धतीने काम करण्यात येत आहे, अशा शब्दात डीकेशींना टोला लगावला. १४ डिसेंबर रोजी डीकेशींच्या सर्व विधानांना मी प्रत्त्युत्तर देईल. जिल्ह्यात १३ जण भाजप आमदार आहेत. यावेळी महांतेश कवटगीमठ यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. तसेच २०२४ मध्ये भारतात पुन्हा मोदींचेच सरकार येणार अशा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबात सध्या तीन आमदार असून चौथाही आमदार आमच्याच कुटुंबाचा असेल, असेही ते म्हणाले.
रमेश जारकीहोळी पुढे म्हणाले, की या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. महांतेश कवटगीमठ यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन काँग्रेसला पराभूत करा. असे रमेश जारकीहोळी यांनी आवाहन केले.


Recent Comments