बेळगाव तालुक्यातील मुतगा या गावातील पीकेपीएस संचालक आणि सचिवांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सदर पीकेपीएसमधून कर्ज दिले जात नसल्याचेही आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.

बेळगाव तालुक्यातील मुलगा या गावातील पीकेपीएसमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संचालक मंडळाच्या कामामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे,बेळगाव तालुक्यातील मुतगा येथील पीकेपीएसमध्ये मोठा घोटाळा झाला असून संचालक मंडळाच्या कामाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे पीकेपीएसवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पीकेपीएस कार्यालयाला टाळे ठोकून उपोषणाला सुरुवात केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून संचालक मंडळ आणि सचिव अमोल पाटील यांनी पीकेपीएस बांधकामात आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेळगाव डीसीसी बँक शेतकऱ्यांना गेल्या ४ ते ५ वर्षांपासून कृषी कर्ज देत नसून यामुळे सरकारी कर्जासह इतर सुविधा मिळविण्यापासून शेतकरी वंचित आहेत. अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली आहे.
अनेकवेळा बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. संचालक मंडळाने कर्जाची परतफेड केली नसून आता प्रत्येक जण एकमेकांवर बोट दाखविण्याचे काम करत आहेत. यासाठी कालपासून याविरोधात पीकेपीएस कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले असून शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सदर पीकेपीएस डोकेदुखी ठरली असून भ्रष्ट संचालक मंडळावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.


Recent Comments