Belagavi

बेळगावात पावसामुळे अल्टो कारवर झाड कोसळले

Share

बेळगावातील कॅम्प परिसरातील चॅपेल रोडवर पावसामुळे अल्टो कारवर झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवानेच या घटनेत प्राणहानी झाली नाही.

होय, गेले काही दिवस बेळगाव परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. कॅम्प परिसरातील चॅपेल रोडवर पावसामुळे अल्टो कारवर झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. पण या घटनेवेळी कारमध्ये अथवा जवळपास कोणी नव्हते. त्यामुळे सुदैवानेच या घटनेत प्राणहानी झाली नाही. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी माहिती दिल्यावर सामाजिक कार्यकर्ते व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पडलेले झाड हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला.

यासंदर्भात साजिद शेख यांनी सांगितले की, कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. त्यामुळे पावसामुळे येथे झाडे कोसळण्याच्या घटना वरचेवर घडतात. आज दुपारीही चॅपेल रोडवर अल्टो कारवर झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. वाहतूक पोलिसांकडून याची माहिती मिळताच आम्ही पडलेले झाड हटवले असे त्यांनी सांगितले.

 

Tags: