बेळगावातील सांबरा विमानतळावर हातमाग उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे–कागेरी यांनी आज हे प्रदर्शन पाहून प्रशंसा केली.

हातमाग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बेळगावातील सांबरा विमानतळावर हातमाग उत्पादनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीसाठी आलेले विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी करून प्रशंसा केली. मल्लप्पा नडकट्टी हे गेल्या ६० वर्षांपासून हातमाग चालवून उपजीविका करतात.
त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्त्रांचे प्रदर्शन सांबरा विमानतळावर भरविण्यात आले. याकामी विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल मौर्य यांचे हातमाग व्यावसायिक संघातर्फे आभार मानण्यात आले. यावेळी शिवलिंग टर्की, शंभुलिंग बडिगेर, महादेव पुकाळे, गोविंदराज, शिवशंकर मुडलगी आदी उपस्थित होते.


Recent Comments