Kagawad

विधानपरिषद उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा विजय निश्चित : लक्ष्मण सवदी

Share

१० डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा पहिल्या पसंतीच्या मतांनी पहिल्या फेरीतच विजय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केलाय.

शिरगुप्पी येथे विधान परिषद निवडणूक प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. जिल्ह्यात ८७०० सदस्य निवडून आले असून त्यापैकी ५७०० जणांचा भाजपाला पाठिंबा आहे. या सर्वांचे प्रथम पसंतीचे मत आमच्या पक्षालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे महांतेश कवटगीमठ यांनी तिसऱ्या वेळी उमेदवारी मिळणे इतके सोपे नाही. त्यांच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले असून सरकारी अनुदानाचा पुरेपूर वापर महांतेश कवटगीमठ यांनी केला असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात १२ जण आमदार, तीन खासदार हे भाजपचे आहेत. यामुळे महांतेश कवटगीमठ यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सवदी यांनी व्यक्त केला.

यावेळी विधानपरिषदेचे उमेदवार महांतेश कवटगीमठ बोलताना म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम मी पार पाडेन. ग्राम पंचायत सदस्यांच्या समस्यांची जाणीव मला असून त्यांच्या मानधनात १०० रुपयांपासून १००० रुपयांची वाढ करण्यात आमचा पक्ष आंदोलन करण्यात अग्रेसर असल्याचे ते म्हणाले. यावेळी मला पुन्हा एकदा निवडून देऊन तुमच्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन महांतेश कवटगीमठ यांनी केले.

माजी मंत्री आणि कागवाद मतदार संघाचे आमदार श्रीमंत पाटील यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले, महांतेश कवटगीमठ हे राजकारणातील बुद्धिवंत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आजपर्यंत अत्त्युत्तम काम केले आहे. ग्राम पंचायतीचा विकास साधायचा असेल, तर महांतेश कवटगीमठ यांना निवडून द्या, असे आवाहन श्रीमंत पाटील यांनी केले.

या प्रचार सभेला नेते श्रीनिवास पाटील, विनायक बागडी, अन्नासाब पाटील, अभयकुमार अकिवाटे, दीपक पाटील, विश्वनाथ पाटील, रामगौडा पाटील, अन्नासाब चौगुला, अण्णागौड पाटील, काका पाटील, राजू कोडोली, पंडित वड्डर, सिद्दू हावळे, योगेश कुंभार, कृष्ण शिंदे, संजय तेलसंग आदींसह जुगुळ, शिरगुप्पी, मोळे, कृष्ण कित्तूर, मंगसुळी, केम्पवाडुगर, कुसनाळ ग्राम पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य उपास्थीत होते.

Tags: