Chikkodi

चिक्कोडीत आता लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड !

Share

ओमायक्रॉन विषाणूमुळे देशपरदेशात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर चिक्कोडीत आता लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.

होय, कोरोनाचे थैमान संपत आले आहे असे वाटत असतानाच अचानक परदेशात कोरोनाचा उत्परिवर्तित घटक विषाणू ओमायक्रॉन आढळून आल्याने जगभर पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. चिक्कोडीतही सध्या भीती पसरली असून, शहरातील सरकारी इस्पितळात लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्याच्या सीमांवर हाय अलर्ट जारी करून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत. कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. गेले ४-५ महिने जनता निवांत होती. मात्र आता कोरोनाच्या नव्या विषाणूच्या भीतीमुळे जनतेची झोप उडाली आहे. त्यामुळे लोक आता लस घेण्यासाठी सरकारी इस्पितळात गर्दी करत आहेत.

नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनही ऍक्शन मोडमध्ये आले आहे. चिक्कोडी उपविभागासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे ठरविले आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

 

 

 

Tags: