अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपची वितरण करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचा आग्रह करत बेळगावमधील सुविधांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आज निषेध मोर्चा काढून आंदोलन केले.

मंगळवारी बेळगावच्या समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करत अनुसूचित जाती – जमातीच्या विद्यार्थ्यांनी फ्री शिप कार्ड अंतर्गत विद्यार्थ्यांना फीमध्ये सूट देण्यात यावी, इबीएल निधी प्रत्येक महिन्यात देण्यात यावा, हॉस्टेलमधील समस्यांचे निराकरण करावे, क्रीडा साहित्य व वाचनालयाच्या पुस्तकांच्या वाटपात होत असलेली दिरंगाई यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. (फ्लो)
यासंदर्भात इन न्यूजशी बोलताना एका दलित नेत्याने सांगितले कि हे सर्व विद्यार्थी महर्षी वाल्मिकी आणि डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे वारसदार आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या व्याप्तीतील विविध महाविद्यालयाच्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. याप्रमाणे अनेक अन्यायकारक गोष्टी घडत असून हे सर्व प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली.(बाईट)
यावेळी भरमू कुरली, परशुराम मूकनवर, पुटनांज सुंकुप्पी, लागमाप्पा अंकलगी, सदाआनन्द ढवळेश्वर आदींसह इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Recent Comments