Tumakuru

सिद्धगंगा स्वामींच्या समाधीला मुख्यमंत्र्यांकडून पुष्पार्चन 

Share

चालताबोलता देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमकूरच्या सिद्धगंगा मठाचे शिवकुमार महास्वामी यांच्या समाधीला पुष्पबिल्वार्चन वाहण्याच्या दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी चालना दिली.

 

वीरशैव लिंगायत युवा वेदिके आणि वीरशैव लिंगायत महावेदिकेच्या वतीने सोमवारी आयबजीत कार्यक्रमाला मुख्यमंत्री बोम्मई उपस्थित होते. त्यांनी यावेळी सिद्धगंगा मठाचे शिवकुमार महास्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मठाचे सध्याचे सिद्धलिंग स्वामी यांचेही दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, चालता-बोलता देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमकूरच्या सिद्धगंगा मठाचे शिवकुमार महास्वामी यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीला पुष्प-बिल्वार्चन वाहिले आहे. शिवकुमार स्वामींचे आशीर्वाद ते असताना मी सुद्धा घेतले आहेत. आधुनिक भारतात त्यांच्याइतके सेवाकार्य कवचितच कोणी केले असेल. त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे. बाईट

सिद्धगंगा स्वामींची पुण्यतिथी दासोह दिन म्हणून जाहीर करण्याबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, या संदर्भात विध्यमान सिद्धगंगा स्वामींशी चर्चा करणार आहे. याबाबत ते जो आदेश देतील त्याप्रमाणे कार्यवाही करू.

यावेळी शिक्षणमंत्री बी. सी. नागेश व अन्य उपस्थित होते.

Tags: