Khanapur

अन त्याने पीकहानी, कर्जाला कंटाळून संपवले जीवन !

Share

पिकांचे नुकसान आणि कर्जाचा बोजा असह्य झाल्याने युवा शेतकऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना खानापूर तालुक्यातील वड्डेबैल गावात घडली

होय, खानापूर तालुक्यातील वड्डेबैल गावातील श्रीपाल महादेव कडबी या ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. अवकाळी पावसाने त्याच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तशातच वैयक्तिक कारणास्तव काढलेल्या कर्जाचा बोजा वाढल्याने तो तणावाखाली होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी आ. व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याचप्रमाणे तहसीलदार आणि पोलिसांना माहिती देऊन पाहणी करण्याचे आवाहन केले.

 

Tags: