Belagavi

राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

Share

 ‘हिंदीच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधीया विषयावर बेळगावातील राणी पार्वतीदेवी कला वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावातील एसकेई सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयात  ‘हिंदीच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे निवृत्त राजभाषा अधिकारी किशोर काकडे यांनी या चर्चासत्राचे उदघाटन केले. त्यानंतर ‘आपली मराठी’सोबत बोलताना किशोर काकडे म्हणाले, हिंदीच्या क्षेत्रात केंद्र सरकारी कचेऱ्यांत आणि शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत हे आपण सगळेच जाणतो. मात्र या व्यतिरिक्तही अशी अनेक क्षेत्र आहेत, जेथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यांची विध्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

आज देश-परदेशात रोजगार उपलब्ध आहेत. मानवाने ग्रहांवरही पाऊल ठेवले आहे. पण कुठेही गेलात तरी आधी भाषा ही शिकावीच लागते. हिंदी असो व अन्य कोणती भाषा, सर्वच भाषांच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत असे काकडे यांनी सांगितले.

राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पोवार यांनी सांगितले की, आरपीडी महाविद्यालयात ‘हिंदीच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील विविध महाविद्यालयांचे पदवी अभ्यासक्रमाचे प्रत्येकी ५ विध्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना हिंदी भाषेच्या क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधींवर मार्गदर्शन करण्यात आले. बाईट

चर्चासत्रात मडगाव-गोवा येथील कोंकण रेल्वेचे अनुवाद अधिकारी सतीश धुरी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. त्यांनी विध्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. शोभा नाईक, प्रा. विजयकुमार पाटील, प्रा. अजित कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चासत्रात सहभागी विध्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

 

Tags: