माझ्या पक्षात मी मोठी होऊ नये का? तुमच्या पक्षात तुम्ही मोठे व्हा ना, त्याऐवजी मला छी थू करायला मी तुमचे काय बिघडवले आहे असा सवाल ग्रामीण आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आ. रमेश जारकीहोळी यांना त्यांचे नाव न घेता केला.

विधान परिषद निवडणूक लढविणार आपले बंधू व काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी बैलहोंगल येथे प्रचारसभेत आ. हेब्बाळकर रमेश जारकीहोळी यांच्यावर चांगल्याच कडाडल्या. पक्षाने उमेदवारी दिली म्हणून विधान परिषद निवडणुकीत उतरलो आहोत. भाजपनेही अधिकृत उमेदवार उभा केलाय. मग यात तिसऱ्याचे काय काम? गेल्यावेळी आमच्या पक्षात असताना आमच्यावरच अन्याय केला. आता भाजपात राहून त्यांच्यावर अन्याय करताहेत. एका लिंगायत महिलेचा त्यांनी अवमान केलाय. हा समस्त स्त्री जातीचा अवमान आहे असा आरोप त्यांनी रमेश यांचे नाव न घेता केला.
रमेश यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करणाऱ्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सतीश जारकीहोळी यांच्यावर मात्र स्तुतीसुमने उधळली. सतीश जारकीहोळी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही विधान परिषद निवडणूक लढवतोय. सतीश हे जारकीहोळी कुटुंबाचे मास्टर माईंड, अग्रणी आहेत अशी स्तुती त्यांनी केली.कुडचीट मतदारांना त्यांनी धमकी दिल्याचे ऐकिवात आहे. ग्राम पंचायत सदस्यांनाही भीती घालत आहेत. मंत्री झाल्यावर पुढे बघून घेईन अशी धमकी देत आहेत. राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, अभिनेता पुनीत राजकुमार अशांनाही मरण चुकले नाही, मग तुम्ही आम्ही कोण मोठे लागून गेलो आहोत असा टोला आ. हेब्बाळकर यांनी रमेश याना लगावला.
या प्रचारसभेला केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी, आ. महांतेश कौजलगी, काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी, किरण साधुनवर आदी उपस्थित होते.


Recent Comments