विधान परिषद निवडणूक आम्ही नक्की जिंकणार आहोत. त्यामुळे आम्ही एजंट, क्लार्क, प्यून काहीही व्हायला तयार आहोत अशी टोलेबाजी केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केली.

जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीसाठीची तयारी आणि पोलिंग एजंट नेमण्याबाबत बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, आम्ही निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर पोलिंग एजंट म्हणून काम करणेही महत्वाचे आहे. त्यामुळे या संदर्भात बैठक घेऊन तयारी केली आहे. गोकाक आणि अरभावीत आम्हाला प्रत्येकी ३०% मते मिळतील. तेथेही आमचे एजंट, कार्यकर्ते आहेत असे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रचारावेळी मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल विचारले असताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था सदस्य मतदारांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सगळीकडे आमचे सदस्य आणि आम्ही पाठिंबा दिलेले सदस्य आहेत. त्यांना समजावून सांगून मतयाचना करण्यात येत आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकंदर, विधान परिषद निवडणुकीत विजय आमचाच असे सगळेच पक्ष म्हणत आहेत. यात कोणाचा विजय होणार हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.


Recent Comments