बुद्धिबळातील ग्रँडमास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले कार्लसन आणि नेपुम्नेची यांच्यातील बुद्धिबळ चॅम्पयनशिपच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे बेळगावमध्येही बिडीसीए च्या वतीने २ दिवसीय बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील मिलेनियम गार्डनमध्ये होणाऱ्या बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन यंदा बिडीसीए तर्फे करण्यात आले असून ६ ते १६ वयोगटातील मुलांसाठी चेस फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यावेळी १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला आहे,
यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ विजेते निरंजन नवगुंद यांनी माहिती दिली आहे. फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे बेळगावमध्ये बिदीसी तर्फे दोन दिवसीय बुद्धीबळ महोत्सव आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेत १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्याही आणखीन विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता असल्याचे नवगुंद म्हणाले.
बिडीसीए चे जिल्हा सचिव गिरीश बचिकर यासंदर्भात बोलताना म्हणाले, सदर बुद्धिबळ स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्याचा आमचा विचार असून यासाठी तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशा स्पर्धा भरविण्याची हि पहिलीच वेळ असून या स्पर्धेत पहिले दोन उपविजेते पुढील फेरीत जातील, असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र देसाई, प्रकाश कुलकर्णी, बिडीसीए अध्यक्ष निलेश भंडारी, दत्तात्रय राव, आरती रोग्गन्नावर, रमेश कुलकर्णी, सी. डी. नवलगुंद आदी उपस्थित होते.


Recent Comments