Belagavi

बेळगावच्या अंजुमन महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Share

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज असलेल्या संविधानाचा औपचारिकपणे स्वीकार केला. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अधिकृतपणे लागू करण्यात आले. आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज बेळगाव अंजुमन महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.

कन्नड संघ आणि संस्कृती विभाग, नेहरू युवा केंद्र, अंजुमन कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सद्भावना भगवान विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंजुमन महाविद्यालय, बेळगाव येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाचा एक भाग म्हणून संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी संविधानाचे शिल्पकार डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमात बोलताना कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री म्हणाल्या, देशातील प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क देणारे डॉ.बी.आर.आंबेडकर हे एक मानवतावादी, तेजस्वी लेखक, वक्ते, लेखक आणि भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले राजकीय नेते होते. प्रत्येकाने संविधान जाणून घेऊन कायद्यासंदर्भात जागरूक असणे गरजेचे आहे, असे मत भजंत्री यांनी व्यक्त केले.

संविधान दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. एच.बी. कोलकार, विशेष व्याख्याते म्हणून रोहित कलरा, डॉ. एच.आय. तीम्मापुरे, प्रो.एस.ए.मुल्ला तसेच विद्यार्थी, प्राध्यापकांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: