विजापूर जिल्ह्यातील बबलादी मठाच्या स्वामीजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तिरुपतीमध्ये उदभवलेल्या जलप्रलयाबाबत ९ महिन्यांपूर्वी त्यांनी भाकीत केले होते.

होय, विजापूर जिल्ह्यातील बबलादी मठाच्या सिद्धू मुत्ता स्वामीजींनी गेल्या शिवरात्रीला ‘आंध्र-केरळला धोका असेल’ अशी भविष्यवाणी केली होती. तेलगू बोलली जाणाऱ्या आंध्रप्रदेशात सध्या जलप्रलय आल्याने सिद्धू मुत्ता स्वामीजींचे ते भाकीत खरे ठरले आहे. हवामानातील बदलामुळे तिरुपतीत सध्या महापूर आला आहे. याचप्रमाणे कर्नाटकातही भूकंप होळी असे भाकीत बबलादी मठाच्या स्वामींनी केले होते. तेसुद्धा खरे ठरले आहे. गेल्या २ महिन्यांत विजापूर जिल्ह्याला अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यंदाच्या शिवरात्री दिवशी सिद्धू मुत्ता स्वामीजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीचा व्हीडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
५०० वर्षांपूर्वी पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या कालज्ञानाच्या आधारे सिद्धू मुत्ता स्वामीजी दर शिवरात्रीला भविष्य कथन करतात. ते खरेही होते असा अनुभव असल्याने विजापूरच्या बबलादी मठाची कर्नाटकात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. येथे येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणू मद्य दिले जाते. भक्तसुद्धा देवाला नैवैध्य म्हणून आंबील किंवा मद्य घेऊन येतात. काहीही असले तरी बबलादी मठाच्या स्वामीजींची भविष्यवाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.


Recent Comments