बेळगावात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी संविधान दिन पाळण्यात आला.

देशात जातीविरहित व्यवस्था, मानवहक्कांचे, लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांचे रक्षण व्हावे या उद्देशाने सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात संविधान दिन पाळण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना एसडीपीसीचे जिल्हा सचिव रशीद खान यांनी, प्रत्येक भारतीयाने त्याचे हक्क आणि कर्तव्ये समजून घेण्यासाठी भारतीय घटनेचा अभ्यास केला पाहिजे. कायदे समजून न घेतल्यानेच आपण प्रगती करू शकत नाही. देशात कोणीच उच्च-नीच नाही हे आपली घटना स्पष्टपणे सांगते असे ते म्हणाले.
यावेळी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments