आ. एस. ए. रवींद्रनाथ यांच्या दावणगेरे येथे शुक्रवारी आयोजित अमृत महोत्सव समारंभात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाग घेतला.

यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी पूजन केले. त्यानंतर रवींद्रनाथ यांचा वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सपत्नीक सन्मान केला. आ. रवींद्रनाथ यांच्यावरील ‘कृषी कन्मनी’ या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी नगरविकास मंत्री भैरती बसवराज, खा. जी. एम. सिद्धेश्वर, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव एम. पी. रेणुकाचार्य, आ. माडाळु वीरुपाक्षप्पा, रामचंद्र आदी उपस्थित होते.


Recent Comments