Belagavi

प्रार्थना करताना योग्य संरक्षण देण्याची ख्रिश्चन समुदायाची मागणी

Share

प्रार्थना करताना योग्य संरक्षण देण्याची मागणी ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांनी बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची भेट घेऊन केली.

बेळगावातील एका प्रार्थना हॉलमध्ये प्रार्थना सुरु असताना काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी प्रार्थनासभा घेण्यास पोलिसांनी बंदी घातल्याचे वृत्त काही माध्यमात आले आहे. या संदर्भात बेळगाव ख्रिश्चन धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांनी बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची भेट घेऊन निवेदन देत संरक्षण पुरविण्याची मागणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी बंदीचा तसा आदेश काढलेला नाही, तुम्ही प्रार्थना करा, आम्ही योग्य संरक्षण देऊ असे आश्वासन दिल्याचे सांगितले. यावेळी ख्रिश्चन समुदायाचे नेते उपस्थित होते.

 

Tags: