Hukkeri

हुक्केरी परिसरात कित्तूर कर्नाटक विजयोत्सवाचे आचरण

Share

हुक्केरी शहरात कित्तूर कर्नाटक विजयोत्सव आणि कर्नाटक राज्योत्सव तसेच हनगल श्री, अभिनेते पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

: हुक्केरी शहरातील विविध कन्नड संघटना, संघ संस्था आणि नागरिकांच्या वतीने राज्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी यांच्या सानिध्यात करण्यात आले होते. विरक्तमठाचे शिवबसव महास्वामी आणि अवुजीकर मठाचे अभिनव मंजुनाथ स्वामी यांच्याहस्ते भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नगरपालिका अध्यक्ष अण्णाप्पा पाटील यांनी मिरवणुकीच्या वाहनांचे उद्घाटन केले. तसेच कन्नड अभिनेते पुनित राजकुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर महास्वामी आणि शिवबसव स्वामी यांनी कन्नड संस्कृतीसंदर्भात विचार मांडले. कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. कर्नाटकाच्या इतिहासात उत्तर कर्नाटकातील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई कर्नाटकचे नामांतर कित्तूर कर्नाटक असे केले. याबद्दल विजयोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे उभयतांनी सांगितले. कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या सोहळ्याची सुरुवात विविध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने करण्यात आली. सदर मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून संचार करून जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात मिरवणुकीची सांगता झाली. यानंतर कोर्ट सर्कलपासून मिरवणूक काढून युवकांनी डीजेवर ताल धरला.

या कार्यक्रमात विविध संघ – संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, नगरपालिका सदस्य, कन्नड संघटनेचे नेते, कार्यकर्ते, कन्नड जानपद परिषद सदस्य, शालेय शिक्षक, कन्नडभाषा प्रेमी सहभागी झाले होते.

Tags: