बेळगावात विधान परिषदेचे समर सुरु झाले आहे. निवडणूक अर्ज दाखल करत एकाहून एक बलवान उमेदवार या रणांगणात उतरले आहेत. याच दरम्यान, ही निवडणूक जारकीहोळी ब्रदर्स आणि हेब्बाळकर कुटुंबातील फाईट आहे का? यावर रमेश जारकीहोळी यांनी ‘छी थू‘ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

होय, भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आ. रमेश जारकीहोळी आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी, ही निवडणूक जारकीहोळी ब्रदर्स विरुद्ध हेब्बाळकर होणार का? असा प्रश्न केला. त्यावर रमेश जारकीहोळी यांनी ‘छी थू’ अशी प्रतिक्रिया देत तेथून काढता पाय घेतला. फ्लो तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना रमेश जारकीहोळी यांनी, भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ याना पहिल्या फेरीतच विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. पहिले मत महांतेश कवटगीमठ यांना विजयी करण्यासाठी दुसरे मत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी द्या असे मी आधीच उघडपणे सांगितले आहे. दिल्लीला जाऊन वरिष्ठांच्या अनुमतीनुसार, दुसरे मत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी, पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पाठिंबा दिला आहे असे त्यांनी सांगितले.
एकंदर, काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आजपासून उभय पक्षांत शाब्दिक रणकंदन माजण्यास सुरवात झाली आहे. निवडणूक संपेपर्यंत ते कोणत्या थराला जाऊन पोहोचते हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.


Recent Comments