विधान परिषद निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी सोमवारी सायंकाळी काँग्रेसकडून ‘बी‘ फॉर्म मिळाल्याने चन्नराज हट्टीहोळी यांनी आज, मंगळवारी काँग्रेस नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

होय, विधान परिषदेत काँग्रेसचा उमेदवार कोण असेल या उत्सुकतेवर अखेर आज पडदा पडला. सोमवारी सायंकाळी ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांना काँग्रेसने पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून बी फॉर्म दिला. त्यानंतर आज सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी, ग्रामीण आ. लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेस बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments