विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्यापूर्वी चन्नराज हट्टीहोळी यांनी भगिनी बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समवेत मंगळवारी आपल्या कुटुंबाचे आराध्य दैवत सुळेभावी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

बेळगाव परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून चन्नराज हट्टीहोळी यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी भगिनी बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समवेत मंगळवारी आपल्या कुटुंबाचे आराध्य दैवत सुळेभावी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून बंधू चन्नराज हट्टीहोळी अर्ज भरणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमचे आराध्य दैवत सुळेभावी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी देवाची प्रार्थना करण्याची हिंदूंची परंपरा आहे. त्यानुसार महालक्ष्मीचे आणि विनायकाचे दर्शन घेतले आहे.
हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी मते देण्याचे आवाहन भाजप नेते करत आहेत. त्यासंदर्भात आ. हेब्बाळकर म्हणाल्या, आता मी सकारात्मक विचार करत आहे. या संदर्भात पुढे बोलेन, माणुसकी हीच माझी संस्कृती आहे. या संस्कृतीने मला जे शिकवले तेच मी अवलंबत आहे. त्यामुळेच मी आज पुढे आली आहे. दुसऱ्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया देणार नाही असे त्यांनी सांगितले.


Recent Comments