विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता प्रारंभ झाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून विध्यमान विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी मंगळवारी पक्षाच्या दिग्गज नेत्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.

होय, गेल्या २ निवडणुकांत विजय मिळवून विधान परिषद सदस्य म्हणून चांगली कामगिरी केलेल्या महांतेश कवटगीमठ तिसऱ्यांदा विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षनेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. फ्लो
त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची बोलताना महांतेश कवटगीमठ म्हणाले, ‘देश आधी, पक्ष आधी’ म्हणणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज भाजपकडे आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. ग्रामीण भागात आमच्या पक्षाच्या तत्व, सिद्धांतावर विश्वास असणारे स्थानिक स्वराज संस्थांचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाच्या नावावर या निवडणुकीतही सहज विजयी होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महांतेश कवटगीमठ यांच्यासमवेत मंत्री उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, खा. मंगल अंगडी, अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, आ. महादेवप्पा यादवाड, अभय पाटील, अनिल बेनके, पी. राजीव, दुर्योधन ऐहोळे, महेश कुमटळ्ळी, महांतेश दौडगौडर, माजी आ. संजय पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments