Kagawad

हुलगबाळीत ८ डिसेंबरला क्षुल्लक दीक्षा विधी

Share

 कृष्णा नदीतीरावरील हुलगबाळी गावचे जैन धर्मानुयायी शांतीनाथ बाबुराव शेट्टी येत्या ८ डिसेंबरला क्षुल्लक दीक्षा स्वीकारणार आहेत.

हुलगबाळी गावातील शांतीनाथ तीर्थंन्कर दिगंबर जैन मंदिरात श्री १०८ विद्याभूषण मुनीमहाराजांकडून श्रावकरत्न शांतीनाथ बाबुराव शेट्टी येत्या ८ डिसेंबरला क्षुल्लक दीक्षा स्वीकारणार आहेत. अल्पशिक्षण घेतलेल्या शांतीनाथ बाबुराव शेट्टी यांनी कृषी-व्यापारातून उदरनिर्वाह करत, गेली ३५ वर्षे धार्मिक कार्यांत गुंतले आहेत. जैन धर्माच्या अहिंसा तत्वाचे काटेकोर पालन करत आले आहेत.

सतत मुनी, साधू-संतांच्या सेवेत राहिल्याने त्यांना वैराग्य प्राप्त झाल्याने गेल्या ३० वर्षांपासून मुनींप्रमाणे दिनचर्या व्यतीत करत आहेत. २१ वर्षांपासून अखंड ब्रह्मचर्य पालन करत आहेत. शांतीनाथ बाबुराव शेट्टी यांनी २०१५ पासून श्री १०८ विद्याभूषण मुनीमहाराजांच्या सूचनेवरून ३ वेळा सामूहिक शुद्ध आहारसेवन, देवपूजा प्रतिक्षमण, प्रायश्चित पालन करत आहेत असे दीपक हुनसिमोरे यांनी सांगितले.

या संदर्भात विद्याभूषण मुनीमहाराज म्हणाले, जैन धर्मानुरागी शांतीनाथ शेट्टी हे जीवनात जैन धर्माच्या अहिंसा तत्वाचे पालन करत आले आहेत. धर्माची सेवा, श्रावक व्रत पालन करत आहेत. त्यांना वैराग्य प्राप्त झाल्याने त्यांनी मुनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, ८ डिसेंबरला दीक्षा दिली जाणार आहे असे सांगितले

आपल्या दीक्षा विधीसंदर्भात माहिती देताना शांतीनाथ शेट्टी म्हणाले, ३५ वर्षांपूर्वी जैन समाजाला एकत्र करून हुलगबाळीत जैन समाजाचे मंदिर उभारले आहे. याच मंदिरात २०१५मध्ये आचार्य विद्याभूषण मिनी महाराजांचा चातुर्मास झाला. सलग ४ महिने त्यांच्या सेवेत गुंतलो असतानाच मला वैराग्यप्राप्ती झाली. तेंव्हापासून आजवर धर्माची सेवा करत जीवनातील ३ आश्रम पार पाडून आता चौथा संन्यासाश्रम स्वीकारणार आहे असे त्यांनी सांगितले.

क्षुल्लक दीक्षा विधीचे प्रतिष्ठाचार्य सवडी येथील कर्नाटक रत्न आनंद उपाध्ये, रामवाडीचे श्रीपाल उपाध्ये आहेत. यावेळी मुनींच्या उपस्थितीत शांतीनाथ शेट्टी यांचा दीपक हुनसिमोरे, आदर्श हुनसिमोरे, सतगौडा अथणी, बाबुराव शेट्टी, रेखा हुनसिमोरे, शांतीनाथ तेरदाळे आदींनी सन्मान केला.

 

 

 

Tags: