Banglore

संत कनकदास याना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

Share

युवा पिढीला आदर्श ठरणारे संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव अजरामर करण्यासाठी त्यांच्या नावे संग्रहालय, सैनिकशाळा आणि त्यांच्या समाधीस्थळाचा विकास करण्यात येत आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेंगळूर येथे सोमवारी राज्यस्तरीय कनकदास जयंती समारंभात मुख्यमंत्र्यांनी संत कनकदास यांना अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, संत कनकदास हे कर्नाटकातील  आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे साहित्य, इतिहास जनमानसात पोहोचला पाहिजे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

संगोळ्ळी रायण्णा हेसुद्धा आजच्या युवकांना आदर्श ठरावे यासाठी त्यांचे नाव अजरामर झाले पाहिजे. संगोळ्ळी या त्यांच्या जन्मगावात सरकारतर्फे त्यांच्या नावे संग्रहालय आणि त्यांच्या समाधीस्थळाचा विकास करण्यात येत आहे. त्यांच्या नावे सैनिकशाळा उभारून केंद्र सरकारशी चर्चा करून संरक्षण खात्याकडे हस्तांतरित करण्यात येईल. सध्या १८० कोटी रुपये खर्चातून हे काम हाती घेण्यात आले आहे. आणखी ५० कोटींचा निधी देऊन ते पूर्ण करण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: