Belagavi

बेळगावात जिल्हा प्रशासनातर्फे संत कनकदास जयंती

Share

 बेळगावात जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी संत कनकदास यांची जयंती साजरी करण्यात आली.

बेळगावातील हळकट्टी सभागृहात झालेल्या कनकदास जयंती कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, डीसीपी डॉ. विक्रम आमटे, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगन्नावर, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विध्यावती बजंत्री, कनक संघाचे अध्यक्ष अशोक सदलगी, ऍड. आर. पी. पाटील तसेच पोलीस व सनदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, बेळगावातील कट्टीमनी सभागृहात झालेल्या समारंभात जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून नमन केले. यावेळी उपाध्यक्ष के. के. शुंठे, सदस्य शिवाजी शहापूरकर, श्रीकांत हादीमनी, भीमशी खानप्पगोळ, रेखा दळवाई, एल. जे. पुजारी, बाबू सांबरेकर, सोमशेखर हिट्टनगी आदी उपस्थित होते.

 

Tags: