बेळगावमध्ये सरासरीपेक्षा शेकडा २३० टक्के इतका अधिक पाऊस झाला आहे तर खानापूर तालुक्यात ५३६७ हेक्टर प्रदेशात उगवलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. बेळगाव जिल्ह्यात शेकडा २३० टक्के अधिक पाऊस झाला असून खानापूर तालुक्यात देखील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यातील २३० टक्के अधिक पाऊस झाला असल्याची प्राथमिक माहिती असून यासंदर्भात येत्या तीन दिवसात संयुक्त सर्व्हेक्षण करण्याची सूचना देण्यात आली आहे. अथणी तालुक्यातील ५०० हेक्टर प्रदेशातील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती मिळाली आहे. तर ३२ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यासोबतच २३९ घरांची अंशतः पडझड झाली आहे, असा अहवाल मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला असून बेळगाव तालुक्यात ११ शाळा इमारतींचे नुकसान झाले आहे. २५ ते २६ नोव्हेंबर पर्यंत अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी सांगितले.
शेतकरी सातत्याने अडचणींचा सामना करत आहेत. वारंवार येणाऱ्या संकटांचा सामना करत शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेऊन तातडीने त्यांच्या समस्या सोडिवण्याची आणि त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी आता प्रशासनाने पार पडणे गरजेचे आहे.


Recent Comments