Vijayapura

दुचाकीने कारला मागून धडक दिल्याने एक ठार; एक जखमी 

Share

दुचाकीने कारला मागून धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना विजापूर जिल्ह्यातील होनगनहळ्ळी रेल्वे गेटजवळ घडली.

विजापूरहून बागलकोटकडे जाणाऱ्या दुचाकीने समोरून जाणाऱ्या कारला ठोकरल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. मृताचे नाव आणि पत्ता समजून आलेला नाही. अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. विजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 

 

 

Tags: