सालाबादप्रमाणे यावर्षीही बेळगावातील नार्वेकर गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवाचा कार्तिक उत्सव भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी 8 वाजता जोतिबाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर 9 वाजता होम-हवन, 10 वाजता अभिषेक, 11 वाजता सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यानंतर 12 वाजता आरती करून तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.


तसेच संध्याकाळी 7.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंदिरातील कार्तिक उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून खडेबाजार पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पुजारी, सामाजिक कार्यकर्ते प्रणय शेट्टी, श्रीराम सेना हिंदुस्तानचे रमाकांत कोंडूसकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून आरती करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचे शाल आणि फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच रात्री 8 वाजता विविध धार्मिक विधी करून जोतिबा देवाला गुलाब खोबऱ्यात खेळविण्यात आले आणि कार्तिक उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments